Wednesday, 28 December 2016

बाप

बाप


हातात पेन अनं मनात भावना,
म्हटल आज बाप काय ते, जरा समजून घ्याव..
बसल्या बसल्या विचार केला,
देवाने कसा असा मनुष्य तयार केला....॥ ध॥ 
 स्वतच्या तळहाताची करून छत्री, सहारा त्याने दिला.
तोच बाप माझ्या प्रत्येक पावलावर सोबत राहिला.. 
जगाची ओळख करताना शिकवत गेला,
माणुसकीचे धडे देत गेला,
सांग ना देवा कसा असा मनुष्य तु तयार केला....॥१॥   
नसेल स्वतःच्या पायात चप्पल पण,
लेकराच्या पायाला कधी चटका नाही बसु दिला.
जगाचा विचार न करता जगण शिकवत गेला..
ऊन,वारा, पाऊस संरक्षण करत गेला..
सांग ना देवा असा कसा देवमाणूस तू तयार केला॥ २॥  
चुकत असेल पाऊल तर शिक्षा करत गेला,
पण स्वतःच्या हिम्मतीवर जगण मात्र शिकवू लागला.. 
या स्री-पुरुष समतेच्या जगात, प्रश्न पडशी माझ्या मनाला,
"बाबा सगळी बंधने मलाच का ?"
"बेटा, मुलगा असे दगड नसे भीती त्याला कशाची, 
पण माझ्या मुली तू आहे काच भीती तुला एका तडाची"
हे समजून सांगताना स्वतः रडला..
सांग ना देवा कसा असा देवमाणूस तू तयार केला॥ ३॥  


संकलन - स्नेहल अष्टेकर. 



7 comments: