Friday, 8 December 2017

मला सवय आहे

हृदयाला माझ्या सवय आहे

कितीही दुःख झाले ना
तरी अश्रु गिळण्याची
मला सवय आहे

चेहऱ्यावर हास्य असताना
दुःख लपवण्याचा
मला सवय आहे

रडत जरी असले ना
अश्रू लपवण्याची
मला सवय आहे

तुझा संदेश येणार नसतानाही
वाट बघत बसायची
मला सवय आहे

तू वळूनही पाहणार नाही
हे माहीत असतानाही
तुला बघण्याची
मला सवय आहे

डोळ्यांना तू दिसणार नाही
हे माहीत असताना
तुझी वाट बघण्याची
मला सवय आहे

झोप येत नसतानाही
मन मारून झोपायची
मला सवय आहे

तू ऐकत नसतानाही
तुझ्याशी निवांत गप्पा मारायची
मला सवय आहे

तू समोर नसतानाही
तुला या पाणावलेल्या डोळ्यांनी बघायची
मला सवय आहे

तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही
अश्या कित्येक सवयी सोबत घेऊन जगण्याची
मला सवय आहे

मला सवय आहे .....

1 comment: