Sunday, 8 January 2017

आपलं हि......

आपलं हि...

आपलं हि कोणी असाव,
हळूच जवळ घेणार,
नकळत हृदयाला स्पर्श करणार,
आपल हि कोणी असाव...
आपल हि कोणी असाव,
प्रेमाने रागवणार,
प्रेमाने समजावणार,

आपल हि कोणी असावं,
आपलं हि कोणी असावं,
आपल्यावर रुसणार,
राग धरून बसणार, 
मात्र समजुत काढल्याने समजणार ,
आपल हि कोणी असावं... 
साथ कधी ना सोडणार...
जन्मभर साथ देणारं,
आपलं हि कोणी असावं,
रागभरले तर समजुत काढणार,
नाकावरचा राग कमी करणार,
आपल हि कोणी असावं...
आपल हि कोणी असावं,
हृदयात घर करणार,
 आणि त्यातच रमणार,
आपल हि कोणी असावं...
आपलं हि कोणी असावं...

संकलन - स्नेहल अष्टेकर.

1 comment: