Sunday, 8 January 2017

बेस्ट फ्रेंड

बेस्ट फ्रेंड


मला वाटायचं त्याच माझ्यावर जीवापाड प्रेम आहे, 
फक्त मी विचारण्याची देरी आहे. 
मला वाटायचं...
             मला हि तो प्रचंड आवडायचा जेव्हा तो मला आपली फ्रेंड म्हणायचा, नाजूक स्माईल द्यायचा, हृदयाला स्पर्श करून जायचा, गप्पा मारायचा माझ्या गुणांना दाद द्यायचा,खुप छान वाटायचं पण मला माहित नव्हत........
                        तो मला फक्त आपली "फ्रेंड" मानायचा.
 तो जीवनात आल्याने जीवनाचे महत्व कळले होते. नको नको वाटणारे जीवन आपले वाटायला लागले होते. कारण मीही त्याला माझा बेस्ट फ्रेंड मानायला लागले होते. त्याचे बोलणे ऐकत असताना मुकेपणाने आपल्या भावना गिळत होते. कारण माझे मन त्याचाकडे गहाण होते. जीवनातील सुख-दुख: तो माझ्याशी शेअर करायचा. स्वत:चे सुख-दुख: लपवुन त्याचे बोलणे शांतपणे एकुन घ्यायचे. एक दोन गोष्टी सांगुन त्याला बरे वाटावे असे काही तरी करायचे त्याच्या बोलण्यापेक्षा त्याच असण्यावरच मी समाधानी असायचे कारण मी त्याला माझा बेस्ट फ्रेंड मानायचे. त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेत होते तो खुश रहावा याची प्रार्थना करत होते. ‘त्याचे जीवन सुखी व्हावे दुख: काय त्याला माहित नसावे.’ कारण मि त्याला माझा बेस्ट फ्रेंड मानत होते. मी कधी ही माझ्या भावना त्याला कळून दिल्या नाही. त्याच्या मनात काय आहे मला कळले नाही. ‘माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या असण्यावरच तो खुश असायचा’ कारण तो मला त्याची मैत्रीण मानायचा. त्या दिवशी त्याचे अन माझे बोलणे झाले. आपल्या मनातील त्याने मला सांगितले. आयुष्यभर एकट राहुन जगत आले होते. दु:खाना मित्र मानत होते. पण त्या दिवशी माझा मित्र मला मिळाला. जीवनाने उंच शिखर गाठल. साथ त्याची मिळाली होती. “मी तुला Like करतो.., Love करतो...  साथ तुझी हवी आहे.” जणू माझ्याच ओळी मी एकत होते. “साथ तुझी मी देणारं प्रेम तुझ्यावरच करणार” तो जीवनात आल्याने जीवनाचे महत्व कळाले होते. सुंदर जीवन झाले होते. पण वाटले नव्हते वेळ असेही काही करणार आहे. साथ माझी तो सोडणार आहे.
   तो गेल्यावर मी सुन्न झाले, आतल्या आत मग्न झाले. त्याच्या आठवणी आठवु लागले त्यांना पुसुन टाकण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागले. तो गेल्यावर मी त्याची भेट टाळली. माझ्या वागण्यातील फरक त्याला कळून देण्याची माझी तयारी नव्हती कारण तिच्या प्रेमात बुडालेल्या त्याला माझ्या अश्रूंची मुळीच कदर नव्हती. मी इतके दिवस असे काहीही दाखवले नाही कारण मी त्याला बेस्ट फ्रेंड मानायचे.     
संकलन- स्नेहल अष्टेकर.

3 comments: